india-china 
देश

भारत-चीनमध्ये मॉस्कोत चर्चा

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - भारत-चीन दरम्यानचा सीमावाद आणखी चिघळला असताना आज (ता. १०) मॉस्को येथे उभय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये चर्चा होणार आहे. 

शांघाय सहकार्य संघटनेअंतर्गत (एससीओ) परराष्ट्रमंत्री परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने दोन्ही देशांचे मंत्री एस. जयशंकर आणि वांग यी हे एकत्र आलेले पाहायला मिळतील. दुसरीकडे, भारताने सीमेवरील संकट पाहता आपली तयारी सुरू ठेवली असून, हिमालयाच्या डोंगराळ भागात हलक्या मालवाहू हेलिकॉप्टरच्या चाचण्या हवाईदलाने घेतल्या आहेत. 

चिनी सैन्याने ताबारेषेवर एप्रिलमधील यथास्थिती पूर्ववत करण्याबाबत टाळाटाळ केल्यानंतर भारतीय लष्कराने  पॅंगॉंग सरोवराच्या दक्षिणेकडील भागांत सामरिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणांवर नियंत्रण मिळविल्याने चीनचा थयथयाट सुरू झाला आहे. चिनी सरकारी माध्यमांमधून भारताला युद्धाची धमकीही दिली जाऊ लागली आहे. त्यापार्श्वभूमीवर सीमावादावर दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांची ही प्रत्यक्ष पहिलीच भेट असेल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सैन्याची जमवाजमव
पॅंगॉंग सरोवराच्या दक्षिण भागात भारतीय सैन्याने मोक्याची ठिकाणे काबीज केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या चीनने उत्तर भागातील फिंगर ४ ते ८ या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली आहे.  भारतीय लष्करालाही सीमांच्या सुरक्षेसाठी तुल्यबळ सैन्य तैनात करावे लागले आहे. 

त्यातच ७ सप्टेंबरला गोळीबाराच्या घटनेने तणावात पराकोटीची भर पडली आहे. मागील ४५ वर्षांत प्रथमच भारत चीन सीमेवर गोळीबार झाला आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

म्हणून गस्त थांबली 
लष्कराच्या म्हणण्यानुसार  पॅंगॉंग सरोवराच्या फिंगर-४ भागापर्यंत चिनी सैन्याच्या घुसखोरीमुळे भारतीय सैन्यदलांच्या गस्तीपथकांना एप्रिलपासून गस्त थांबवावी लागली आहे. याआधी फिंगर आठपर्यंत भारताची गस्त होत असे. दोन्ही देशांच्या वाटाघाटीनंतर चिनी सैन्याने फिंगर पाचपर्यंत माघार घेतली तर भारतीय सैन्यालाही फिंगर दोनपर्यंत मागे यावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोटात जोराची कळ, हायवेवर शौचालय दिसेना, गाडी पळवल्यानं मलाच ४ वेळा दंड झाला; न्यायमूर्तींनी NHAIला फटकारलं

BJP MLA: पाणी प्रश्नावर आवाज उठवला तर BJP आमदाराने थेट पायच तोडले... नेमकं काय घडलं? अजून एकालाही अटक नाही

Latest Marathi News Updates : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Pune News : सदनिकाधारक, भाडेकरूंना मोठा दिलासा; भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिकांवर अतिरिक्त सेवा शुल्क आकारता येणार नाही

SCROLL FOR NEXT